सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.05 टी.एम.सी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 01:35 PM2019-06-20T13:35:32+5:302019-06-20T13:38:25+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

8.05 TMC water storage in the Warana dam in Sangli district | सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.05 टी.एम.सी पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.05 टी.एम.सी पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.05 टी.एम.सी पाणीसाठाजिल्ह्यात सरासरी 3.70 मि.मी. पावसाची नोंद


सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 12.16 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 1.87 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 1.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 1.78 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 1.39 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात 21.52 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात काल सरासरी 3.70 मि.मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 3.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 16 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.4, जत - निरंक, खानापूर-विटा 2.8, वाळवा-इस्लामपूर 4.9, तासगाव 0.9, शिराळा 10, आटपाडी - 16, कवेठमहांकाळ 0.2, पलूस 5 आणि कडेगाव तालुक्यात 1.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 

Web Title: 8.05 TMC water storage in the Warana dam in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.