कवठेमहांकाळ तालुक्यात ८३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:55+5:302021-01-16T04:31:55+5:30
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शुक्रवारी मोठ्या चुरशीने; पण शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. चोख पोलीस ...
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शुक्रवारी मोठ्या चुरशीने; पण शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. चोख पोलीस बंदोबस्त होता. एकूण दहा गावांसाठी ८३.६८ टक्के मतदान झाले.
दुपारी तीनपर्यंत तालुक्यातील दहा गावांतील मतदान सुमारे ७१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. स्थानिक नेते कार्यकर्तकडून मतदारांना खेचून आणत होते.
तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी मोघमवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. उर्वरित दहा ग्रामपंचायतीच्या घेऊन निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया झाली. तिसंगी ७९ टक्के, नागोळे ८४ टक्के, चोरोची ७५ टक्के, बनेवाडी ८२ टक्के, मैशाल एम ८६ टक्के, जांभुळवाडी ८७ टक्के, थबडेवाडी ८५ टक्के, इरळी ८८ टक्के, रायवाडी ८४ टक्के,
मतदान केंद्रांवर तहसीलदार बी. जे. गोरे, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त होता. गावागावात मतदारांना ने-आण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी वाहनांची व्यवस्था केली होती.
चौकट
आरोग्याची काळजी
एकूण १५ हजार मतदारांपैकी १३,०९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६२४४ स्त्रियांनी तर ६८५१ पुरुषांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव मागण्यासाठी मतदार आल्यानंतर मतदाराचे तापमान, सॅनिटायझरची व्यवस्था होती.
फोटो-१५कवठेमहांकाळ१