सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 02:27 PM2019-07-01T14:27:55+5:302019-07-01T14:30:07+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 8.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 13.89 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 1.96 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 1.81 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 2.82 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 2.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात 21.11 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
आटपाडी तालुक्यात 18.3 मि. मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 2.90 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 18.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.6, जत 1, वाळवा-इस्लामपूर 0.6, तासगाव 1.7, शिराळा 11.2, आटपाडी 18.3, कवठेमहांकाळ 3, कडेगाव 1.6, खानापूर-विटा व पलूस - निरंक.