जिल्ह्यात कोरोनाचे नवे ८७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:45+5:302021-03-17T04:27:45+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी दिवसभरात नवे ८७ रुग्ण आढळून आले. गेल्या दोन महिन्यांतील ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी दिवसभरात नवे ८७ रुग्ण आढळून आले. गेल्या दोन महिन्यांतील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. उपचाराखालील रुग्णसंख्येनेही चारशेचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी धोक्यांची घंटा मानली जात आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार पार झाली आहे. तर ४६ हजार ८९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ८७ नवे रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. सांगलीत २६ व मिरजेत ५ असे ३१ रुग्ण शहरातील आहेत. त्याखालोखाल जत तालुक्यात २२ तर आटपाडी तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले. वाळवा तालुक्यात ९, मिरज व खानापूर तालुक्यात प्रत्येकी ३, तासगाव तालुक्यात ५, तर शिराळा तालुक्यात २ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. याशिवाय परजिल्ह्यातील कोल्हापूर, पुणे, कर्नाटक व रत्नागिरी येथील प्रत्येकी एक असे चार रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या ४९७ चाचण्यांत ५० तर अँटिजेनच्या ४७२ चाचण्यांत ४१ जण पाॅझिटिव्ह आले. सध्या ४३० रुग्ण उपचाराखाली असून त्यातील ५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर ३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३१५ रग्ण होम आयसोलेशनमध्ये असून १०५ रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : ४९०९१
कोरोनामुक्त झालेले : ४६८९२
उपचाराखालील रुग्ण : ४३०
आतापर्यंतचे मृत्यू : १७६९
चौकट
मंगळवारी दिवसभरात
सांगली : २६
मिरज : ५
आटपाडी : १२
कडेगाव : ०
खानापूर : ३
पलूस : ०
तासगाव : ५
जत : २२
कवठेमहांकाळ : ०
मिरज : ३
शिराळा : २
वाळवा : ९