जिल्ह्यात ८८७ नवे रुग्ण; २५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:41+5:302021-06-06T04:20:41+5:30
गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. ...
गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू झाला त्यात कुपवाड येथील एक, तर वाळवा पाच, कडेगाव, तासगाव प्रत्येकी तीन, जत, कवठेमहांकाळ प्रत्येकी दोन, शिराळा, मिरज तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले असून, शनिवारी आठ हजार २०८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात आरटीपीसीआर अंतर्गत २७३७ जणांच्या नमुने तपासणीतून ३६८ जण बाधित आढळले. रॅपिड अँटिजनच्या ५४७१ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ५५४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या १० हजार २२२ रुग्णांपैकी १६०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात १३६१ जण ऑक्सिजनवर, तर २४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ७ जणांचा मृत्यू, तर नवे ३५ जण उपचारांसाठी दाखल झाले आहेत.
चौकट -
म्युकरमायकोसिस बाधितांची संख्या वाढत असून, शनिवारी दोघांना बाधा झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
चाैकट -
आतापर्यंतचे एकूण बाधित १२३०४९
उपचार घेत असलेले १०२२२
कोरोनामुक्त झालेले १०९२७९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३५४८
पॉझिटिव्हिटी रेट १०.८०
शनिवारी दिवसभरात
सांगली ९८
मिरज १६
वाळवा १५४
मिरज तालुका ११४
शिराळा ८०
कवठेमहांकाळ ७९
कडेगाव ६२
खानापूर ६०
तासगाव, जत प्रत्येकी ५८
आटपाडी ३३