जिल्ह्यात नवे ८९२ रुग्ण, ९२० जणांनी केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:16+5:302021-07-21T04:19:16+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. मंगळवारी नवे ८९२ रुग्ण आढळून आले, तर ९२० जणांनी ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. मंगळवारी नवे ८९२ रुग्ण आढळून आले, तर ९२० जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील २२, तर परजिल्ह्यातील दोन अशा २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
मंगळवारी महापालिका क्षेत्रात ११३ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत ९२, मिरजेत २१ रुग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक १४० रुग्ण तासगाव तालुक्यात आढळले. आटपाडी तालुक्यात १०५, जत ४६, कडेगाव ८५, कवठेमहांकाळ ६९, खानापूर ६६, मिरज ५९, पलूस ४९, शिराळा ३९, वाळवा १२१; तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील ९ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील २२ जणांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, कडेगाव, पलूस तालुक्यातील प्रत्येकी १, खानापूर, जत तालुक्यातील २, कवठेमहांकाळ ३, तर महापालिका क्षेत्रासह वाळवा व मिरज तालुक्यातील प्रत्येकी ४ रुग्णांचा समावेश आहे. तर परजिल्ह्यातील कोल्हापूर व सोलापुरातील प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या १०२९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर जिल्ह्यातील ९२० व जिल्ह्याबाहेरील १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या ४,१९३ चाचण्यांत ३९३ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ८,६४२ चाचण्यांत ५०८ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,६६३६३
कोरोनामुक्त झालेले : १,५१६०२
आतापर्यंतचे मृत्यू : ४,४३३
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : ९२
मिरज : २१
आटपाडी : १०५
जत : ४६
कडेगाव : ८५
कवठेमहांकाळ : ६९
खानापूर : ६६
मिरज : ५९
पलूस : ४९
शिराळा : ३९
तासगाव : १४०
वाळवा : १२१