मुख्यमंत्री निधीतून गरजूंना ९ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:53+5:302021-06-11T04:18:53+5:30
राजारामनगर येथे प्रतीक पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, बाळासाहेब ...
राजारामनगर येथे प्रतीक पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, इलियास पिरजादे, आयुब बारगीर, संभाजी पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यात समाजातील गरजूंना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पाच व्यक्तींना दीड लाख रुपयांच्या आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील (मालेवाडी), अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, आयुब बारगीर उपस्थित होते. श्यामराव पाटील यांची साहित्य संस्कृती मंडळावर निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रतीक पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रतीक पाटील म्हणाले, अभियानने गेल्या सहा महिन्यात समाजातील गरजू व्यक्तींच्या कागदपत्रांची पूर्तता करून ६२ प्रस्ताव मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिले होते. त्यातील २० प्रस्तावांना मंजुरीसह ९ लाखांचा निधी मिळाला आहे. यामध्ये मेंदू विकार १६, कॅन्सर २, तर लिव्हर ऑपरेशन २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
यावेळी उज्ज्वला पाटील, विकास कुलकर्णी, सुरेंद्र बांदल, संघटक मुरली जाधव, अनिल जाधव, श्रीरंग नाईक, राजाराम जाधव उपस्थित होते.