वाडीभागाई येथील माळावर ९०० फळझाडे बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:38+5:302021-04-30T04:32:38+5:30
वाडीभागाई येथील माळावर उभारलेला लाँच टॉवर, दुसऱ्या छायाचित्रात सर्जेराव मोरे यांनी लावलेली झाडी. फोटो-२९०४२०२१-आयएसएलएम- सर्जेराव मोरे लोकमत न्यूज नेटवर्क ...
वाडीभागाई येथील माळावर उभारलेला लाँच टॉवर, दुसऱ्या छायाचित्रात सर्जेराव मोरे यांनी लावलेली झाडी.
फोटो-२९०४२०२१-आयएसएलएम- सर्जेराव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : वाडीभागाई (ता. शिराळा) येथे इलेक्ट्रिक मोटार विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या सर्जेराव तुकाराम मोरे ( रा. सागाव) यांनी माळावर ९०० फळझाडे लावून उत्तम प्रकारे जगविली आहेत.
मोरे मूळचे सागाव (ता. शिराळा) चे आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय इलेक्ट्रिक मोटार विक्री व दुरुस्ती असा आहे. शेतीची आवड असल्याने वाडीभागाई येथे दीड एकर जमीन घेतली. अगदी डोंगराळ भागात असल्याने जमीन दुरुस्तीसाठी मोठा खर्च केला. एक विहीर काढून सर्व झाडांना ठिबकद्वारे पाणी दिले. या मोकळ्या डोंगराळ ठिकाणी लिंबू, आंबा, नारळ, चिकू, काजू, हनुमान फळ, फणस अशी जवळ जवळ ९०० झाडे या खडकाळ ठिकाणी लावली व उत्तम प्रकारे जगविली आहेत. ही फळझाडे आता लहान स्वरुपात आहेत.
या ठिकाणी एक लाँच टाॅवर केला असून येथून या भागातील डोगरांची रांग, झाडी असे फार मनोहारी निसर्ग सौंदर्य पहावयास मिळते. आज हा परिसर हिरवागार झाला असून मोरे कुटुंब या झाडांची जोपासना मुलाप्रमाणे करीत आहेत. केवळ हौसेपोटी केलेली ही फळबाग आता या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.