जिल्ह्यात कोरोनाचे ९०१ नवे रुग्ण; २४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:34+5:302021-06-17T04:19:34+5:30
सांगली : जिल्ह्यात बुधवारी ९०१ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहतानाच मृत्यूसंख्याही कमी झाली. दिवसभरात परजिल्ह्यातील पाच ...
सांगली : जिल्ह्यात बुधवारी ९०१ जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहतानाच मृत्यूसंख्याही कमी झाली. दिवसभरात परजिल्ह्यातील पाच जणांसह जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. ८६३ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ३, मिरज २, वाळवा ४, पलूस, तासगाव, शिराळा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, जत, खानापूर तालुक्यात एका मृत्यूची नोंद झाली.
आरोग्य यंत्रणेने बुधवारी आरटीपीसीआरअंतर्गत २८४७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३३३ पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७६७९ जणांच्या नमुने तपासणीतून ५९६ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात सध्या ९०५१ जण उपचार घेत असून त्यातील ११५६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९४४ जण ऑक्सिजनवर तर २१२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला तर नवे २८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णसंख्येतील वाढ बुधवारीही कायम होती. दिवसभरात दोन रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या २५३ वर पोहोचली आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १३३०७६
उपचार घेत असलेले ९०५१
कोरोनामुक्त झालेले १२०२२९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३७९६
पॉझिटिव्हिटी रेट ८.८२
बुधवारी दिवसभरात
सांगली १०९
मिरज ३५
आटपाडी ३०
कडेगाव ५४
खानापूर ६०
पलूस ७८
तासगाव ५२
जत ६०
कवठेमहांकाळ ३१
मिरज तालुका ८७
शिराळा ६१
वाळवा २४४