९२ वर्षांच्या आजोबांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:12+5:302021-06-01T04:20:12+5:30
ओळी : बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले सहकारी रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून ९२ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. त्याबद्दल विश्वनाथ मिरजकर ...
ओळी : बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले सहकारी रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून ९२ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. त्याबद्दल विश्वनाथ मिरजकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या कोविड सेंटरमधून कर्नाटकातील ९२ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सोमवारी ते घरी परतले. शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षक बँकेच्या वतीने सहकारी रुग्णालयाची नोंदणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात या रुग्णालयामार्फत कोविड सेंटर सुरू करण्यात आले. पहिल्या लाटेतही हे सेंटर सुरू होते. या सेंटरमधून १०० हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी मंगसुळी (कर्नाटक) येथील बाळकृष्ण पाटील या ९२ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला मात दिली.
शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अजित पाटील, कार्यकारी संचालक तुकाराम गायकवाड, शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत, डॉ. विक्रम कोळेकर आदी उपस्थित होते.