सांगली बाजार समितीसाठी चुरशीने ९३.७५ टक्के मतदान, महाआघाडी, भाजपमध्ये चुरस 

By अशोक डोंबाळे | Published: April 28, 2023 07:13 PM2023-04-28T19:13:39+5:302023-04-28T19:14:04+5:30

इस्लामपूर बाजार समितीत ८६.५७ टक्के तर विट्यात ९१.३० टक्के

93.75 percent polling for Sangli Bazar Committee | सांगली बाजार समितीसाठी चुरशीने ९३.७५ टक्के मतदान, महाआघाडी, भाजपमध्ये चुरस 

सांगली बाजार समितीसाठी चुरशीने ९३.७५ टक्के मतदान, महाआघाडी, भाजपमध्ये चुरस 

googlenewsNext

सांगली : सांगली, इस्लामपूर, विटा बाजार समित्यांसाठी शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या चुरशीने मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर सांगली बाजार समितीसाठी सर्वाधिक ९३.४५ टक्के तर इस्लामपूर ८६.५७ टक्के आणि विटा बाजार समितीसाठी ९१.३० टक्के मतदान झाले आहे. सांगली, इस्लामपूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीविरोधात भाजप अशी थेट लढत होती. विट्यात मात्र काँग्रेस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप आघाडीविरोधात राष्ट्रवादी आणि नाराज भाजप, काँग्रेस अशी आघाडी होती.

सांगली, मिरज, कवठेमहांकाळ व जत येथील २४ मतदान केंद्रांवर सकाळी ८:०० वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच चुरशीने मतदान सुरु होते. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी - अडते, हमाल - तोलाईदार आदींचे ८ हजार ६३५ मतदार आहेत. यापैकी मतदानाची वेळ संपेपर्यंत ८ हजार १०५ मतदान झाले आहे. अडते व व्यापारी गटातील मतदान एक हजार ७७५ होते. त्यापैकी केवळ एक हजार १८६ मतदान झाले आहे.

उर्वरित सोसायटी, ग्रामपंचायत आणि हमाल व तोलाईदार गटात चुरशीने मतदान झाले आहे. एकूण मताच्या ९३.४५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोज सुरवसे यांनी सांगितले. दरम्यान, सर्वच निवडणूक केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

इस्लामपूर बाजार समितीचे चार हजार ७५२ मतदानापैकी चार हजार ११४ मतदान झाले आहे. ८६.५७ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले. सांगली आणि विटा बाजार समितीपेक्षा इस्लामपूर बाजार समितीमध्ये मतदान कमी झाले आहे.

विटा बाजार समितीमध्येही मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे. एकूण तीन हजार १२६ मतदानापैकी दोन हजार ८५४ मतदान झाले असून ९१.३ टक्के मतदान झाले आहे.

असे झाले मतदान

बाजार समिती  एकूण मतदान  झालेले मतदान  टक्केवारी
सांगली                ८६७३                ८१०५                 ९३.४५
इस्लामपूर           ४७५२                ४११४                 ८६.५७
विटा                   ३१२६                 २८५४                 ९१.३०

Web Title: 93.75 percent polling for Sangli Bazar Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.