जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९४८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:25+5:302021-07-14T04:32:25+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ९४८ रुग्ण आढळून आले. महिनाभरानंतर रुग्णसंख्येत महापालिका क्षेत्राने वाळवा तालुक्याला मागे टाकले. ...
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नवे ९४८ रुग्ण आढळून आले. महिनाभरानंतर रुग्णसंख्येत महापालिका क्षेत्राने वाळवा तालुक्याला मागे टाकले. दिवसभरात सर्वाधिक २०४ रुग्ण शहरात सापडले. जिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला. बळीची संख्या घटल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत साडेनऊशेच्या घरात स्थिर आहे. मंगळवारी महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २०४ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीत १३४, मिरजेत ७० रुग्णांचा समावेश आहे. त्याखालोखाल वाळवा तालुक्यात १६८ रुग्ण आढळून आले. आटपाडी तालुक्यात ४३, जत ३१, कडेगाव ७६, कवठेमहांकाळ ४९, खानापूर ८१, मिरज ९०, पलूस ६३, शिराळा ५४, तासगाव ८९; तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे जिल्ह्यातील २५ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात जिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला. त्यात आटपाडी, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी २, पलूस १, वाळवा तालुक्यातील ५; तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या १०५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर जिल्ह्यातील ९५० व जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या ३,९३० चाचण्यात ३०१ पाॅझिटिव्ह, तर अँटिजनच्या ९,६८६ चाचण्यात ६७२ रुग्ण सापडले.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : १,५९,१६९
कोरोनामुक्त झालेले : १,४४,७६२
आतापर्यंतचे मृत्यू : ४,३०७
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
सांगली : १३४
मिरज : ७०
आटपाडी : ४३
जत : ३१
कडेगाव : ७६
कवठेमहांकाळ : ४९
खानापूर : ८१
मिरज : ९०
पलूस : ६३
शिराळा : ५४
तासगाव : ८९
वाळवा : १६८
चौकट
तालुकानिहाय पाॅझिटिव्हिटी दर जाहीर करा : साखळकर
संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित पाॅझिटिव्हिटी दर काढला जातो. त्याऐवजी तालुकानिहाय पाॅझिटिव्हिटी दर प्रशासनाने जाहीर करावा. ज्या तालुक्यात पाॅझिटिव्हिटी दर जास्त आहे, तिथे कडक निर्बंध लागू करावेत, जिथे कमी दर आहे तेथील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी कोरोना रुग्ण सहाय्य समितीचे सतीश साखळकर यांनी केली.