जिल्हा परिषदेच्या सदस्यांना ९.६० कोटींच्या निधीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:12+5:302021-05-11T04:28:12+5:30
सांगली : पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला नऊ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीचे प्रत्येक सदस्याला तत्काळ ...
सांगली : पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला नऊ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीचे प्रत्येक सदस्याला तत्काळ वाटप करण्यात येत आहे. या निधीतून कोरोनात आरोग्य सुविधांवर प्राधान्याने खर्च करावा, असे आवाहन अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे.
कोरे म्हणाल्या की, शासनाकडून नऊ कोटी ६० लाखांचा निधी मिळाल्यानंतर तातडीने तो वाटपासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. त्यानुसार येत्या चार दिवसांत तो पंचायत समितीला पाठविण्यात येणार आहे. कोरोनामध्ये मूलभूत सुविधांसाठी निधीचा प्राधान्याने खर्च करण्यास हरकत नाही. पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनाही निधी मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतींनीही प्राधान्याने आरोग्यावर निधी खर्च करावा.
चौकट -
उपचारांसाठी पुढे या
कोरोनाबाबत अनेकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. यामुळे ते उपचार न घेता घरातच बसून आहेत. गंभीर झाल्यानंतर ते उपचारास येतात. रुग्णांनी किरकोळ आजार असेल तरीही कोरोना चाचणी करून उपचार घ्यावेत, असे मत प्राजक्ता कोरे यांनी व्यक्त केले.