शिराळा तालुक्यात ९८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:27+5:302021-04-28T04:29:27+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात मंगळवारी नवीन ९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. मिरुखेवडी येथे २२ रुग्ण आढळून आले आहेत. ...
शिराळा : शिराळा तालुक्यात मंगळवारी नवीन ९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. मिरुखेवडी येथे २२ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईहून आलेले हे नागरिक आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने मुंबईकर तसेच इतर जिल्ह्यातून नागरिक येत असल्याने पुन्हा एकदा धोका वाढत आहे.
मंगळवारी दिवसभरात २२७ चाचण्या करण्यात आल्या. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
यामध्ये मिरुखेवडी येथे २२, कोकरूड व शिराळा येथे प्रत्येकी १०, मांगले येथे ६, लादेवाडी, आरळा, फकीरवाडी, कांदे, शिरसटवाडी येथे प्रत्येकी ४, पनुम्बरे तर्फ शिराळा ३, मणदूर, मोरेवाडी, पाडळेवाडी, आंबेवाडी, बिऊर, गिरजवडे, सांगाव येथे प्रत्येकी २, मालेवाडी, औढी, बांबवडे, बिळाशी, देववाडी, धामवडे, करुंगली, कोडोली, रांजणवाडी, शेडगेवाडी, शिराळे खुर्द, उपवळे, ठाणापुडे प्रत्येकी १ असे ९८ रुग्ण आढळून आले. सध्या तालुक्यात ५१८ रुग्ण उपचाराखाली आहेत. यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटरमध्ये १०, शिराळा कोविड रुग्णालयात ४४, कोकरूड कोविड रुग्णालयात २०, स्वस्तिक हॉस्पिटल येथे १४, दालमिया सेंटरमध्ये १ रुग्ण दाखल आहे. होम आयसोलेशनमध्ये ४२८ रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.