भर पावसात लागलेल्या आगीत कार जळून खाक, मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:16 IST2022-10-11T14:04:26+5:302022-10-11T14:16:58+5:30
मिरज बोलवाड रोडवर दोन दिवसापूर्वी इनोव्हा वाहनाला अशाच प्रकारे आग लागल्याची घटना घडली होती.

भर पावसात लागलेल्या आगीत कार जळून खाक, मिरजेतील घटना
मिरज: मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरात भर पावसात कारमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीतकार जळून खाक झाली. आगीची घटना लक्षात येताच नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, अग्निशमन दलाची गाडी जवान घटनास्थळी पोहचू पर्यंत आगीच्या विळख्यात कार जळून खाक झाली होती.
सुनील विष्णुपंत कुलकर्णी यांनी मंगळवार पेठ येथे चर्च समोर कार पार्किंग केली होती. दरम्यान, वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन कारमधून आगीचे लोट बाहेर येऊ लागले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती. दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचू पर्यंत आगीच्या विळख्यात कार जळून खाक झाली. मिरज बोलवाड रोडवर दोन दिवसापूर्वी इनोव्हा वाहनाला अशाच प्रकारे आग लागल्याची घटना घडली होती. आज पुन्हा कारला आग लागल्याची ही घटना समोर आली.