‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने सांगलीतील तरुणीची सव्वा तीन लाखाची फसवणूक

By घनशाम नवाथे | Published: July 10, 2024 05:08 PM2024-07-10T17:08:55+5:302024-07-10T17:09:29+5:30

सांगली : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रूपयांची ...

A girl from Sangli was cheated of three and a half lakhs by the lure of work from home | ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने सांगलीतील तरुणीची सव्वा तीन लाखाची फसवणूक

‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने सांगलीतील तरुणीची सव्वा तीन लाखाची फसवणूक

सांगली : ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत उजमा अनिस मुजावर (वय २०, रा. मुजावर गल्ली, समडोळी) यांनी संशयित चाहत राजपूत व शिरीन (पूर्ण नाव नाही) रा. गुरगाव (हरियाणा) या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उजमा मुजावर या बी.कॉम. झाल्या आहेत. संशयित महिला चाहत आणि शिरीन या दोघींनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यांना नोकरी डॉट कॉम द्वारे एका नामांकित कंपनीमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी देतो असे खोेटे सांगितले. त्यांनी मुजावर यांचा विश्वास संपादन केला. त्यांना नोकरी पूर्वी प्रोसेसिंग फी, लॅपटॉप, डे स्टॉक, ओळखपत्र, कंपनीचे कीट व इतर वस्तू आणि सुरक्षा अनामत अशी कारणे सांगून ऑनलाईन ३ लाख २५ हजार २८० रूपये घेतले. दि. २७ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या दरम्यान हा प्रकार घडला. 

त्यानंतर मुजावर यांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची कोणतीही नोकरीची संधी दिली नाही. त्यांनी विचारणा केल्यानंतर दोघी महिलांनी टाळाटाळ केली. मुजावर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार दोघींविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगली ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

Web Title: A girl from Sangli was cheated of three and a half lakhs by the lure of work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.