Sangli: विट्यात किरकोळ वादातून डोक्यात फरशी मारून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 04:18 PM2024-06-01T16:18:42+5:302024-06-01T16:19:00+5:30

संशयित ६ तासांच्या आत गजाआड

A man was killed by a brick wall over a dispute in vita sangli | Sangli: विट्यात किरकोळ वादातून डोक्यात फरशी मारून एकाचा खून

Sangli: विट्यात किरकोळ वादातून डोक्यात फरशी मारून एकाचा खून

विटा : ‘मोबाइलचे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी तुझे आधारकार्ड मला दे, नाहीतर तुला इमारतींच्या रंगकामाची कामे देऊ नका, असे सर्वांना सांगेन,’ अशी भीती घालून सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून डोक्यात फरशीचा घाव घालून राजेंद्र भाऊसो यादव (वय ५८, रा. कडेपूर, ता. कडेगाव) यांचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विटा येथील नेवरी नाका येथे घडली.

याप्रकरणी तातडीने तपास करून संशयित सागर अशोक वाघमारे (वय ३०, रा. शाहूनगर, विटा) यास विटा पोलिसांनी ६ तासांच्या आत गजाआड केले. कडेपूर येथील राजेंद्र यादव हे इमारत रंगकामाचे काम करतात. संशयित सागर वाघमारे हासुद्धा रंगकाम करतो. या दोघांची जुनी ओळख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सागर वाघमारे व मयत राजेंद्र यादव या दोघांनी नेवरी नाक्यावरील एका देशी दारूच्या दुकानात मद्यप्राशन केले.

त्यानंतर हे दोघेही दुकानाच्या बाहेर असलेल्या गुरूप्रसाद प्लाझाच्या समोरील मैदानात आले. त्यावेळी मयत राजेंद्र यादव यांनी तू बाहेरचा आहेस, तुला रंगकाम देऊ नका, असे मी ठेकेदारांना सांगतो. मला सिमकार्ड घेण्यासाठी तुझे आधारकार्ड दे, असे म्हणून त्रास देऊ लागला. त्यावेळी या दोघांत मोठा वाद झाला.

या वादात संशयित सागर वाघमारे याने जवळच पडलेला फरशीचा तुकडा घेऊन मयत राजेंद्र यांच्या डाव्या बाजूला डोक्यात मारला. त्यावेळी यादव हे जागीच कोसळले. याची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी राजेंद्र यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

विटा पोलिसांना घटनास्थळावरील साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सागर अशोक वाघमारे यानेच मयत राजेंद्र यांच्या डोक्यात फरशीने घाव घालून त्यांचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित सागर वाघमारे याला विटा पोलिसांनी तातडीने अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता त्यास दि. ६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: A man was killed by a brick wall over a dispute in vita sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.