crime news sangli: शेअर बाजारात नफ्याचा फंडा, एकास सहा लाखांचा गंडा; फेसबुकवरून झाली होती ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:28 PM2022-12-15T12:28:29+5:302022-12-15T12:29:10+5:30
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला लाभ मिळत असतो, असे आमिष दाखविले
इस्लामपूर : तीन वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर आष्टा (ता. वाळवा) येथील एकास शेअर बाजारात पैसे गुंतवून त्यावर जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवत दोघा भामट्यांनी पाच लाख ८३ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत घडला.
याबाबत विजय शिवाजी फसाले (रा. आष्टा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रेया प्रकाशसिंग उर्फ मिताली चंदेल (रा. पुणे) हिच्यासह आणखी एका अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
फसाले यांच्याशी फेसबुकवरून ओळख आणि मैत्री झाल्यानंतर या भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला लाभ मिळत असतो, असे आमिष दाखविले. तीन लाख रुपये दिल्यास दिवसाला २५ हजार रुपये मिळवून देण्याचा शब्द दिला होता.