सांगलीतील तिकोंडीमध्ये कर्नाटकच्या ध्वजासह पदयात्रा, मुख्यमंत्री बोम्मईंचा फलक लावला

By श्रीनिवास नागे | Published: November 26, 2022 06:10 PM2022-11-26T18:10:55+5:302022-11-26T18:11:29+5:30

सांगली : तिकोंडी (ता. जत) येथील सर्व ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. शनिवारी गावात कर्नाटकचे ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात ...

A procession with the flag of Karnataka in Tikondi in Sangli | सांगलीतील तिकोंडीमध्ये कर्नाटकच्या ध्वजासह पदयात्रा, मुख्यमंत्री बोम्मईंचा फलक लावला

सांगलीतील तिकोंडीमध्ये कर्नाटकच्या ध्वजासह पदयात्रा, मुख्यमंत्री बोम्मईंचा फलक लावला

Next

सांगली : तिकोंडी (ता. जत) येथील सर्व ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. शनिवारी गावात कर्नाटकचे ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली आणि कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला.

जत पूर्व भागातील तिकोंडी गावापासून तीन किलोमीटरवर कर्नाटकातील विजयपूर जिल्हा आहे. ग्रामस्थांनी शनिवारी कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोरून बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा काढली. कर्नाटकने तीन वर्षांपासून तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी तिकोंडीजवळच्या तलावात सोडले आहे. कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते, तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार, असे गेल्या ५० वर्षांपासून सांगत आहे. त्याच मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. आम्हाला महाराष्ट्र कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४२ गावांचा कर्नाटकात समावेश करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले असून, त्या विधानास पाठिंबा देण्यासाठी फेरी काढण्यात आली. गावातील कमानीवर बोम्मईंचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला. त्यावर त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून फलक काढला.

कर्नाटकात जाण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊ, असे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी महांतेश अमृत्तट्टी, वसीम मुजावर, महांतेश राचगोंड, सोमनिंग चौधरी, रामू नुली, महादेव कोहळ्ळी, मल्लाप्पा गोब्बी, अनिल हट्टी, तम्माराया अमृत्तटी, इरान्ना राचगोंड, गौडाप्पा माडोळी, अंबाण्णा कोळी उपस्थित होते.

Web Title: A procession with the flag of Karnataka in Tikondi in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.