मासे पकडण्यासाठी लावलेले जाळे बघायला गेला, अन् ओढापात्रात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 01:45 PM2023-12-19T13:45:55+5:302023-12-19T13:47:15+5:30
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचा ओढापात्रातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. प्रदीप ...
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचा ओढापात्रातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. प्रदीप उर्फ बाबूराव प्रकाश देसाई (वय ९) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे.
ढालगावच्या पूर्वेस देसाई वस्तीत जिल्हा परिषद शाळा आहे. शाळा सुटल्यानंतर तिसरीच्या वर्गात शिकणारा प्रदीप उर्फ बाबूराव प्रकाश देसाई (वय ९) हा ओढा पात्रात मासे पकडण्यासाठी मित्रांनी लावलेले जाळे पाहण्यासाठी गेला होता. तो त्या जाळीला पकडण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला.
पायाने थोडासा दिव्यांग असल्याने त्याला पोहता आले नाही. प्रदीप पाण्यात पडल्याचे बराच वेळ कुणालाच समजले नाही. त्यामुळे बाहेर काढण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.