सांगलीतील संखमध्ये भीषण आगीत कापड दुकान जळून खाक, सुमारे दोन कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 06:20 PM2023-11-17T18:20:09+5:302023-11-17T18:21:30+5:30
दरीबडची : संख (ता.जत) येथे गडदे वस्त्र निकेतनला आग लागून कापड दालन जळून खाक झाले. यात सुमारे दोन कोटी ...
दरीबडची : संख (ता.जत) येथे गडदे वस्त्र निकेतनला आग लागून कापड दालन जळून खाक झाले. यात सुमारे दोन कोटी रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.
संख येथे स्टँण्डजवळ सुनिल मारुती गडदे यांचे गडदे वस्त्र निकेतनचे दुमजली दुकान आहे. दुकानला लागून महिलाचे कापड दुकान आहे. सकाळच्या सुमारास या कापड दुकानाला आग लागली. दुकानातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही.
आगीची माहिती अग्निशमक विभागाला मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. दिवाळी सणा निमित्त मोठ्या प्रमाणात कापडाचे स्टॉक करण्यात आले होते. आगीत मोठे नुकसान झाले. घटनास्थळी मंडलाधिकारी एस आर. कोळी, तलाठी विजय बालठे, कोतवाल कोळी यांनी केला. पंचनामाचा संख अप्पर कार्यालयात सादर केला.