मिरजेतील ढोल-ताशांचा अवघ्या महाराष्ट्रभरात घुमतोय आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:40 AM2023-09-18T11:40:16+5:302023-09-18T11:41:19+5:30

श्रावण, गणेशोत्सवात कोट्यवधीची उलाढाल

A turnover of crores in the market of musical instruments in Miraj | मिरजेतील ढोल-ताशांचा अवघ्या महाराष्ट्रभरात घुमतोय आवाज!

मिरजेतील ढोल-ताशांचा अवघ्या महाराष्ट्रभरात घुमतोय आवाज!

googlenewsNext

सदानंद औंधे

मिरज : तंतूवाद्यांसाठी जगभर ख्याती असलेल्या मिरजेत सर्वच वाद्यांची कुशलतेने निर्मिती होते. येथील साऱ्याच वाद्यांच्या तालावर आता संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील श्रावणातील पारंपरिक उत्सव व गणेशोत्सव रंगताना दिसत आहे.

श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मोठी मागणी असल्याने मिरजेतील वाद्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मिरजेतून राज्यासह गोवा व कर्नाटकात वाद्यांची निर्यात सुरू आहे. तंतूवाद्यांसोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती उत्सव, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी वाद्ये मिरजेत मिळतात. श्रावण व गणेशोत्सवात वाद्यांना मागणी असल्याने दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मिरजेच्या वाद्यांच्या बाजारपेठेत दरवर्षी दोन ते कोटींची उलाढाल होत असल्याचे विक्रेते संजय मिरजकर यांनी सांगितले.

ही वाद्ये मिळतात

मिरजेमध्ये ढोल-ताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला, डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये मिळतात. सर्व वाद्ये होलसेल बाजारात उपलब्ध असल्याने या वाद्यांना महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यातूनही मागणी आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक या प्रदेशांची स्वतंत्र वाद्यसंस्कृतीही वाद्यांच्या मागणीवरून लक्षात येते.

वाद्यांच्या किमती

धनगरी ढोल : लाकडी ५ ते १२ हजार
स्टील ढोल : २ ते ४ हजार
ढोलकी : २ ते ३ हजार
हार्मोनियम : ८ ते २५ हजार
तबला डग्गा : ४ ते ६ हजार
संबळ : दीड हजार
जोडी
टाळ : ३०० ते १२००
स्टील ताशा : ८००
तांबा पितळेचा ताशा : ५ ते १५ हजार
झांज : ५०० ते १५००
आरती मशीन : ९ ते १३ हजार

Web Title: A turnover of crores in the market of musical instruments in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली