Sangli: फेसबुकवरुन ओळख, फोटो व्हायरलची धमकी देत डॉक्टर महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 04:21 PM2023-12-09T16:21:07+5:302023-12-09T16:21:57+5:30

सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने ...

A woman doctor who was introduced through Facebook was taken advantage of and raped in sangli | Sangli: फेसबुकवरुन ओळख, फोटो व्हायरलची धमकी देत डॉक्टर महिलेवर बलात्कार

Sangli: फेसबुकवरुन ओळख, फोटो व्हायरलची धमकी देत डॉक्टर महिलेवर बलात्कार

सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी दिली. त्यानंतर तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित हर्षवर्धन अंकुश कुंभार (रा.पाटण, जि. सातारा) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, पीडित महिला सांगलीतील डॉक्टर आहे. २०२१ मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून संशयित हर्षवर्धन याच्याशी ओळख झाली. फेसबुकवर मैत्रीच्या नात्यातून त्यांच्यात संवाद होत होता. दोघांची चांगली ओळख होती. ओळखीतूनच हर्षवर्धन याने आर्थिक अडचण सांगून पीडितेकडून ५० हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर तिला फिरायला जायचे असल्याचे खोटे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

या प्रकारानंतर पीडितेने त्याच्याकडे उसने पैशाची मागणी केली. तेव्हा हर्षवर्धन याने ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो तिच्या व्हॉटस ॲपवर टाकला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तीन कोटी रुपये खंडणी मागितली. पीडितेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ती काम करत असलेल्या ठिकाणी येऊन मारहाण केली. धमकी देत तिला मोटारीतून निर्जनस्थळी नेत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. तिच्या मुलाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली.

या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत हर्षवर्धन याच्यावर बलात्कार आणि खंडणीचा तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. गुरुवारी हर्षवर्धनला अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

Web Title: A woman doctor who was introduced through Facebook was taken advantage of and raped in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.