Sangli: पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:06 PM2024-02-26T12:06:04+5:302024-02-26T12:06:41+5:30

मिरज-पंढरपूर रस्त्यावर अपघात : तिघे जखमी

A young man on his way to police recruitment training died in a collision with a pick-up truck in sangli | Sangli: पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू

Sangli: पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर कळंबी येथे पिकअपने दोन दुचाकींना ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार श्रीशैल आमसिद्ध खंबाळे (वय २४, रा. भोसे) हा तरुण ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात घडला.

जखमींना मिरज शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीशैल खंबाळे याच्यासह चौघेजण रविवारी दुपारी दोन दुचाकीवरून भोसे येथून मिरज जिल्हा क्रीडा संकुलात पोलिस भरती प्रशिक्षणासाठी चालले होते. मिरज-पंढरपूर महामार्गांवर कळंबी येथे दोन्ही दुचाकींना मागून येत असलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली.

अपघातात श्रीशैल खंबाळे हा जागीच ठार झाला, तर विश्वजित मोहिते, प्रथमेश हराळे, प्रज्ज्वल साळुंखे (तिघेही, रा. भोसे) जखमी झाले. पोलिस भरती प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या श्रीशैलच्या अपघाती मृत्यूने भोसेत हळहळ व्यक्त होत होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: A young man on his way to police recruitment training died in a collision with a pick-up truck in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.