Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन उपाळे मायणीत तरुणाचा भोसकून खून, हल्ल्यात दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:12 PM2024-08-06T19:12:39+5:302024-08-06T19:12:48+5:30

कडेगाव : उपाळे मायणी (ता.कडेगाव) येथे प्रेमप्रकरणातून राहणारी महिला सोडून गेल्याच्या रागातून तिचा विभक्त पती सागर रायबा पवार (वय-२२, ...

A young man was stabbed to death on suspicion of having an immoral relationship in Mayani sangli | Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन उपाळे मायणीत तरुणाचा भोसकून खून, हल्ल्यात दोघे जखमी

Sangli: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन उपाळे मायणीत तरुणाचा भोसकून खून, हल्ल्यात दोघे जखमी

कडेगाव : उपाळे मायणी (ता.कडेगाव) येथे प्रेमप्रकरणातून राहणारी महिला सोडून गेल्याच्या रागातून तिचा विभक्त पती सागर रायबा पवार (वय-२२, रा. उपाळे मायणी) याचा गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. सागरला वाचवण्यास आलेले दिग्विजय जयवंतराव बल्लाळ (२१) व प्रशांत जयवंतराव बल्लाळ (१७, दोघे रा.उपाळे वांगी,ता.कडेगाव) हे दोघे हल्ल्यात जखमी झाले. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

या खून प्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशयित सुरज चंद्रकांत माने, मयूर दादासो पडळकर, सौरभ संतोष जमदाडे (सर्व रा.उपाळे मायणी) या तिघावर गुन्हा दाखल केला. तर अन्य एक अल्पवयीन तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर मारहाणीत दिग्विजय बल्लाळ व प्रशांत बल्लाळ हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत विशाल रायबा पवार (रा.नागाचे कुमठे, ता. खटाव, जि. सातारा) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उपाळे मायणी येथे काल रविवारी (ता.4) रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी सुरज माने याचे सोबतची महिला निघून गेल्याच्या कारणाचा राग मनात धरुन संशयित आरोपी सुरज माने, मयूर पडळकर, सौरभ जमदाडे व अन्य एक अल्पवयीन तरुण यांनी संगणमत करुन सागर पवार याला येथील शाळेत बोलवून घेऊन त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी सुरज माने याने गुप्तीने सागर पवार याला गुप्तीने भोकसून त्याचा खून केला. 

दिग्विजय बल्लाळ व प्रशांत बल्लाळ हे भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांना देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करून संशयित आरोपी सुरज माने याने दिग्विजय बल्लाळ याचे डावे डोळ्याचे खाली दगड फेकून मारून त्यास किरकोळ जखमी करून धमकी दिली आहे. तर प्रशांत बल्लाळ हाही मारहाणीत जखमी झाला आहे. या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विटा विभाग विटा विपुल पाटील हे करीत आहेत.

Web Title: A young man was stabbed to death on suspicion of having an immoral relationship in Mayani sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.