सांगलीतील इस्लामपुरात डेंग्यूने तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 03:54 PM2022-11-18T15:54:13+5:302022-11-18T15:54:44+5:30

डेंग्यू साथीला आटोक्यात आणणे आरोग्य विभागासमोर आव्हान

A young woman died of dengue in Islampur Sangli | सांगलीतील इस्लामपुरात डेंग्यूने तरुणीचा मृत्यू

सांगलीतील इस्लामपुरात डेंग्यूने तरुणीचा मृत्यू

Next

इस्लामपूर : शहरातील सर्वच विभागातील आरोग्य सुविधा सलाईनवर आहेत. परिणामी दोन वर्षात डेंग्यू व चिकुनगुनिया साथीने नागरिक त्रासलेले आहेत. शिवनगर परिसरात एका २२ वर्षीय तरुणीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

रस्ते गटारी यांची कामे थांबली आहेत. स्वच्छता ठेकेदारच्या मक्तेदारीमुळे वेळेत गटारी साफ होत नाहीत. अतिवृष्टीने काही गटारी पडल्या आहेत. उरण परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आहेत. वेळेत उपचार सुविधा नाही. खासगी उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे.

इस्लामपूर पालिका स्वच्छता ठेकेदारावर कोटीच्या घरात खर्च करते. यामध्ये फक्त मलिदाच गोळा होतो. रस्त्यावरच कचरा असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पसरते. ती आटोक्यात येऊ शकत नाही. फक्त कागद काळा करून बिले काढली जातात. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी सूर असतो. त्यामुळे डेंग्यू साथीला आटोक्यात आणणे आरोग्य विभागाला आव्हान ठरले आहे

शहरातील अस्वच्छ गटारी वेळेत साफ होत नाही. त्यामुळे डेंग्यू सारख्या साथीने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवनगर परिसरातील प्राजक्ता रणभिसे या तरुणीचे डेंग्यूने निधन झाले. यापूर्वीही काही रुग्ण दगावले आहेत. याची दखल आरोग्य खाते कधी घेणार असा प्रश्न उपस्थित करूनही दखल घेतली जात नाही. - दादासाहेब पाटील माजी उपनगराध्यक्ष

Web Title: A young woman died of dengue in Islampur Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.