आम आदमी पार्टीतर्फे वीज बिल माफीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:54+5:302021-04-07T04:28:54+5:30
सामान्य घरगुती मीटरधारकांना व शेतकऱ्यांना सवलत देऊन शासनाने निवडणुकीदरम्यान दिलेल्या वचनाची पूर्ती करावी. वीज बिल माफीसाठी आम आदमी पार्टीतर्फे ...
सामान्य घरगुती मीटरधारकांना व शेतकऱ्यांना सवलत देऊन शासनाने निवडणुकीदरम्यान दिलेल्या वचनाची पूर्ती करावी. वीज बिल माफीसाठी आम आदमी पार्टीतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ३० टक्के स्वस्त वीज देण्याच्या वचनपूर्तीसह कोविडदरम्यान मार्च ते ऑगस्ट या महिन्याची २०० युनिट वीज बिल माफी करावी, गतवर्षीच्या थकीत बिलावर व्याज आकारू नये. शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल माफी करावी, वीज कंपन्यांचे ऑडिट करण्यात यावे. केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी. या मागण्यांची दखल न घेतल्यास आम आदमी पार्टीतर्फे सोमवार, दि. १९ एप्रिल रोजी सत्याग्रह करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी वसिम मुल्ला, आरिफ मुल्ला, फय्याज सय्यद, विनोद मोरे, झोहेब मुल्ला, रवींद्र बनसोडे, श्रीकांत चंदनवाले, परवेज पटेल, तोफिक हवालदार, निसार मुल्ला, संदीप कांबळे, जावेद अत्तार उपस्थित होते.