आबा-काका गट भिडणार

By admin | Published: May 29, 2017 11:19 PM2017-05-29T23:19:45+5:302017-05-29T23:19:45+5:30

आबा-काका गट भिडणार

The Aba-Kaka group will climb | आबा-काका गट भिडणार

आबा-काका गट भिडणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : आॅक्टोबरमध्ये तासगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. गावा-गावात व भावा-भावात आबा-काका गटाचा पुन्हा संघर्ष धुमसणार आहे. मणेराजुरी, आरवडे, वायफळे, उपळावी, कुमठे, अंजनी, चिंचणी, शिरगाव या बड्या गावांचा यामध्ये समावेश आहे.
भाजपने नगरपालिका ताब्यात ठेवली. मात्र सेनापतीशिवाय लढणाऱ्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पालिका पराजयाचा वचपा काढला. गावोगावी मे महिन्यातील उन्हाप्रमाणे राजकीय वातावरण तापत आहे. मतदारांची किरकोळ कामे करीत ‘लक्ष राहू द्या’ असे मतदाराला सांगितले जात आहे.
राजकारणासाठी तासगाव तालुका राज्यभरात संवेदनशील म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री आर. आर. आबा व खा. संजयकाका यांचा जीवघेणा राजकीय संघर्ष तर कमालीचा टोकाचा होता. दोन्ही गटाचे राजकारण घरा-घरात, भावा-भावात शिरून गाव, घरे जळाली. दोन एकाच आईची पोरं राजकारणानं एकमेकांचा जीव घ्यायला उठली. आबांच्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था सेनापती नसलेल्या सैन्यागत होती. बडे बडे मोहरे पक्ष सोडून काका गटात गेले. मात्र सेनापतीशिवाय आबांच्या सैन्याने बाजार समिती निवडणुकीत विजय मिळविला. नगरपालिका निवडणुकीत त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे कमळ काकांनी तासगाव नगरपालिकेवर फुलविले.
मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटात जोरदार चुरस झाली. काकांनी नेतेच उचलल्याने, राष्ट्रवादीला उमेदवार मिळतो की नाही, अशी अवस्था होती. पण गावोगावी कडवी लढत होऊन, खोटा आत्मविश्वास ठेवलेल्या भाजपचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पराभव केला. राष्ट्रवादीने वादळात दिवा लावला.
आता २६ ग्रामपंचायतींचा कार्यकाल डिसेंबरमध्ये संपत आहे. निवडणुकीची तयारी गावा-गावात सुरू झाली आहे. यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सता आहे. मात्र सत्ता मिळविण्यासाठी आॅक्टोबरमध्ये तासगाव तालुक्यात आबा-काका गटाचा संघर्ष पुन्हा धुमसणार आहे.
संवेदनशील गावे : राष्ट्रवादीची सत्ताचिंचणी, अंजनी, आरवडे, बलगवडे, बस्तवडे, बेंद्री, भैरववाडी, कचरेवाडी, खुजगाव, कुमठे, लिंब, मणेराजुरी, नागाव, मतकुणकी, नागेवाडी, नेहरुनगर, निमणी, पुणदी, सावर्डे, शिरगाव, उपळावी, वंजारवाडी, वासुंबे, वायफळे, योगेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये होणार आहेत. ही गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत.

Web Title: The Aba-Kaka group will climb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.