आबा, आज तुम्ही हवे होतात...

By Admin | Published: February 17, 2016 12:41 AM2016-02-17T00:41:04+5:302016-02-17T00:42:18+5:30

सर्वसामान्यांची प्रतिक्रिया : कवठेमहांकाळ तालुक्यात भावपूर्ण आदरांजली

Aba, you want it today ... | आबा, आज तुम्ही हवे होतात...

आबा, आज तुम्ही हवे होतात...

googlenewsNext

कवठेमहांकाळ : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची पहिली पुण्यतिथी कवठेमहांकाळ तालुक्यात भावूक वातावरणात झाली. ठिकठिकाणी प्रतिमेस अभिवादन करून आबांना आदरांजली वाहण्यात आली. आजच्या टंचाईच्या स्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी आबा असायला हवे होते, अशी तीव्र भावना सर्वसामान्यांमधून उमटत होती.
गतवर्षी १६ फेब्रुवारी रोजी आर. आर. पाटील यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुक्यात विविध संस्थांच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
महांकाली साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे संचालक गणपती सगरे यांच्याहस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, पुंडलिक पाटील, हणमंत शिंदे, कार्यकारी संचालक मनोज सगरे, शेती अधिकारी रवींद्र चौगुले, मुख्य लेखाधिकारी राम सपकाळ, शंकर कदम, एम. बी. माळी उपस्थित होते.
राजर्षी शाहू विचार मंचच्या कार्यालयात प्रा. दादासाहेब ढेरे यांच्याहस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती गजानन कोठावळे, मुबारक मुल्ला, राजाभाऊ सपकाळ, राजेंद्र बनसोडे, प्रा. शौकत मुलाणी उपस्थित होते.
मळणगाव ग्रामपंचायतीत सरपंच रमेश भोसले यांनी आर. आर. पाटील यांना आदरांजली वाहिली. यावेळी सुधाकर पाटील, संजय चव्हाण, दीपक गुजले, पोपट गुजले, विजय मलमे, सचिन गुजले, राजू भोसले, मधुकर पाटील उपस्थित होते.
हिंगणगाव ग्रामपंचायतीत सरपंच संगीता कोळेकर यांनी आबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी नीलेश लोंढे, वर्षा लोंढे, शीतल पाटील, मधुकर कोळेकर, किसन शेजाळ, सुरगोंडा पाटील अनिल पाटील, गीतांजली माळी, शोभा सगरे, रावसाहेब पाटील, शशिकांत इरळे, अमोल लोंढे उपस्थित होते.
कुची कॉर्नर येथेही विनोद देशिंगे, सुनील साळुंखे, आबासाहेब मेस्त्री, निखिल शिंदे, यल्लाप्पा चव्हाण यांनी आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. (वार्ताहर)

विकास खुंटला
आबांसारखा दुसरा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही. आबांच्या जाण्याने केवळ तासगाव-कवठेमहांकाळचे नुकसान झाले असे नाही, तर सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. गरिबांचा आधार तुटला आहे. आबांची आठवण म्हणून आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करू, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक गणपती सगरे यांनी यावेळी दिली.

Web Title: Aba, you want it today ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.