शहनाईच्या स्वरछटांनी रंगली मिरजेची संगीत सभा 

By अविनाश कोळी | Published: February 6, 2024 06:08 PM2024-02-06T18:08:38+5:302024-02-06T18:08:56+5:30

अब्दुल करीम खां स्मृती संगीत सभेत दिग्गज कलाकारांचा सहभाग

Abdul Karim Khan Memorial Sangeet Sabha organized at Mirasaheb Dargah on the occasion of Mirj Dargah Urus | शहनाईच्या स्वरछटांनी रंगली मिरजेची संगीत सभा 

शहनाईच्या स्वरछटांनी रंगली मिरजेची संगीत सभा 

मिरज : मिरजेत दर्गा उरुसानिमित्त मीरासाहेब दर्ग्यात आयोजित अब्दुल करीम खां स्मृती संगीत सभेत पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन, शहनाईवादनास श्रोत्यांनी दाद दिली. प्रथेप्रमाणे दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गायन-वादन करून तीन दिवसीय संगीत सभेस प्रारंभ झाला. 

पंडित शैलेश भागवत यांचे शहनाईवादन झाले. त्यांनी शहनाईवर राग आहिर भैरव आळवला. त्यांना प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली. पंडित व्यंकटेशकुमार यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग कोमल ऋषभ आसावरी गायला. त्यांना मनमोहन कुंभारे यांनी तबला साथ व सारंग सांभारे यांनी संवादिनीसाथ केली. पंडित धनंजय जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. जोशी यांनी राग बसंत गायला. त्यांच्या विविध चिजाना श्रोत्यांनी दाद दिली. 

संजीव जहागीरदार यांनी राग गौड सारंग गायला. वृत्तत्रेतला त्यांनी नजर नही आऊंगा ही बंदिश व भाग्य द लक्ष्मी बारम्मा हे भजन गायले. त्यांना प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ व सारंग सांभारे यांनी संवादिनीसाथ केली. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर यांनी संयोजन केले. रात्री दुसऱ्या सत्रात किराणा घराण्यातील दिग्गजांच्या गायन -वादनाने पहाटेपर्यंत मैफल रंगली.

Web Title: Abdul Karim Khan Memorial Sangeet Sabha organized at Mirasaheb Dargah on the occasion of Mirj Dargah Urus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.