सांगलीत विवाहितेवर बलात्कार करून गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:52+5:302021-04-07T04:28:52+5:30
सांगली : २७ वर्षीय तरुणीवर सहा महिन्यांपासून बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सागर प्रकाश कोळेकर (वय २४, श्रीरामनगर, गल्ली ...
सांगली : २७ वर्षीय तरुणीवर सहा महिन्यांपासून बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सागर प्रकाश कोळेकर (वय २४, श्रीरामनगर, गल्ली नं. ८, विजयनगर, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पीडित तरुणी कुटुंबीयांसह सांगलीत राहते. कोळेकरने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. दरम्यान, गेल्या डिसेंबरमध्ये तिचे लग्न अन्य एका तरुणाशी झाले. संशयित कोळेकरने तिला ‘तू लग्नानंतर पाच दिवसांनी परत ये, आपण दोघे निघून जाऊ,’ असे सांगितले. त्यानुसार, ती आली असता, कोळेकरने जयसिंगपूर येथे नेले. तेथे बलात्कार केला. जयसिंगपुरातच एका खोलीत भाड्याने राहू लागले. भाडे परवडत नसल्याने काही दिवसांनी परत सांगलीत आले. शहरात भाड्याने राहू लागले. तेथेही कोळेकरने बलात्कार केला.
दरम्यान, ती चार महिन्यांची गर्भवती झाली. कोळेकरने जबरदस्तीने औषधे घेण्यास भाग पाडून गर्भपात केला. नंतर तिच्याशी लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन तपास करत आहेत.