राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धेक सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:11 PM2020-02-13T12:11:18+5:302020-02-13T12:13:17+5:30
सांगली : राजारामबापू चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ फेब्रवारी या कालावधित राज्यस्तरीय तायक्वॉंदो ...
सांगली : राजारामबापू चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ फेब्रवारी या कालावधित राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धा आयोजित केल्या आहेत. महाराष्टÑात प्रथमच इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग सिस्टिमद्वारे तायक्वांदो स्पर्धा होत आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय पाटील व सुरेश चौधरी यांनी दिली.
पाटील म्हणाले की, राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील असून तायक्वॉंदो फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष संजयकुमार शर्मा, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भास्कर करकेरा, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
सांगली जिल्हा क्रीडा संकुलात तीन दिवस स्पर्धा चालणार आहेत. सब ज्युनिअर गटात ५ ते ११ वयोगटातील खेळाडू, कॅडेट गटात ११ ते १४ वयोगटातील, ज्युनिअर गटात १४ ते १७ वयोगटातील तर सिनिअर गटात १७ वर्षापुढील खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजते खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धेक सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचे संयोजन सुरेश चौधरी व आनंदराव नलवडे करीत आहेत.
अचुकतेसाठी यंत्रणा
क्रीडा स्पर्धा म्हटल्या की, वशिलेबाजीचा आरोप अनेकदा होतो. मात्र या आरोपांना अथवा अशा प्रकारांना थाराच मिळणार नाही अशी सोय संयोजकांनी केली आहे. या स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंच्या पॅडवर सेन्सर बसवले जाणार आहेत. त्यामुळे त्यांना मिळणारे गुण इलेक्ट्रॉनिक सिस्टीमनेच दिले जाणार आहेत. ते थेट स्क्रिनवर दिसणार आहेत. त्यामुळे कोणतीही वशिलेबाजी होणार नाही. अशा पध्दतीच्या स्कोअर बोर्डचा वापर पहील्यांदाच महाराष्ट्रात होत असल्याचे संयोजकांनी सांगितले.