सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:22 PM2019-07-29T15:22:20+5:302019-07-29T15:24:53+5:30

सांगली जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील. भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले.

Access to all in BJP; But not a word of the MLA | सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

सुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

Next
ठळक मुद्देभाजपात सर्वांना प्रवेश; पण आमदारकीचा शब्द नाहीसुरेश खाडे म्हणतात, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत

सांगली : जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील.

नव्याने पक्षात येणाऱ्यांमुळे जून्या नेत्यांना अडचण होईल, असे वातावरण नसून पक्षात येणाऱ्या सर्वांना आमदार केलेच पाहिजे, असा कुठला नियम नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची माहिती देण्यासाठी सांगलीत आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुका व पक्षातील इनकमिंगवर भाष्य केले.

खाडे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या मनातच भाजप पक्ष रूजल्याने संपूर्ण राज्यात अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. सांगली जिल्ह्यातील भाजपचा विचार करता, अगोदरच पक्ष भक्कम झाला आहे. लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहेच. तरीही पक्षात कोण येत असेल तर त्यांचे स्वागतच केले जाईल.

Web Title: Access to all in BJP; But not a word of the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.