जतमधील सोरडीत पॅरोलवर आलेल्या आरोपीची आत्महत्या, जन्मठेपेची भोगत होता शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:15 PM2022-05-14T19:15:52+5:302022-05-14T19:16:27+5:30
जत : सोरडी (ता. जत) येथे पॅरोलवर आलेल्या आरोपीने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. शशिकांत विठ्ठल शितोळे ...
जत : सोरडी (ता. जत) येथे पॅरोलवर आलेल्या आरोपीने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. शशिकांत विठ्ठल शितोळे (वय ३३) असे त्याचे नाव आहे. काल, शुक्रवारी रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
सोरडी येथील शशिकांत शितोळे याने जमिनीच्या वादातून खून केला होता. त्याच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सात ते आठ महिन्यांपासून तो कळंबा (जि. कोल्हापूर) कारागृहात होता. त्याला जन्मठेपेची १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दीड महिन्यापूर्वी तो पॅरोल रजेवर घरी आला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा पत्नीबरोबर वाद झाला होता. गुरुवारी सकाळी शशिकांतने राहत्या घरी विष प्राशन केले. याबाबत जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर मयत हा आरोपी असल्याने त्याच्या पार्थिवाचे मिरज येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.