Sangli: रामापुर येथील खुनप्रकरणातील आरोपीला जामखेडमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:42 PM2023-08-22T18:42:32+5:302023-08-22T18:43:17+5:30
वांगी : शिरगांव फाटा (ता. कडेगांव ) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या मारामारीत सुरेश राजाराम पाटील हे ठार झाले ...
वांगी : शिरगांव फाटा (ता. कडेगांव ) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या मारामारीत सुरेश राजाराम पाटील हे ठार झाले होते. या प्रकरणी फरारी आरोपी रोहित माळी यास जामखेड येथे अटक करण्यात आली. त्याला कडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली.
शिरगाव फाटा येथे शनिवारी (दि.१९) एका हॉटेलमध्ये मयत सुरेश पाटील बसले होते. यावेळी आरोपी रोहित आनंद माळी हा येऊन बसल्यानंतर सुरेश पाटील व रोहित माळी यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जावून हाणामारी झाली. रोहित यांनी सुरेश पाटील यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी करून पलायन केले होते.
फरार रोहितला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक पदमा कदम यांचे मार्गदर्शनाखाली चिंचणी- वांगी पोलिसांनी पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांना आरोपी हा जामखेड येथील लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. तात्काळ चिंचणी - वांगी पोलीस ठाण्याचे पथक जामखेड रवाना झाले. अन् आरोपी रोहीत माळी याला ताब्यात घेतले. त्याच कडेगाव न्यायालयात हजर केले असता त्यास ३ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. या पथकामध्ये स.पो.नी. संदीप साळुंखे, पोलीस हवालदार रविद्र धाडवड, अमोल पाटील, दिपक यादव, हरी पवार, संपत जाधव होते.