विनामास्क फिरणाऱ्या ४८१ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:34+5:302021-02-21T04:50:34+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी जिल्हाभरात ४८१ ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी जिल्हाभरात ४८१ जणांवर कारवाई करताना ९१ हजारांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्ह्यात कोरोनास्थिती सध्या नियंत्रणात असली तरी राज्यात वेगाने संसर्ग वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातही प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार मास्कचा वापर महत्त्वाचा असून, तो न करता बिनधास्त फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार दोन दिवसांत ४८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर होणारी कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे.