कुमठेतून वाळू चोरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:20+5:302021-03-10T04:28:20+5:30
सांगली : तासगाव तालुक्यातील कुमठे येतील ओढापात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून ती चोरून नेणाऱ्या ट्रकचालकावर सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ...
सांगली : तासगाव तालुक्यातील कुमठे येतील ओढापात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करून ती चोरून नेणाऱ्या ट्रकचालकावर सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी डंपर मालक बाबासाहेब प्रकाश लुगडे (टोप संभापूर, ता. हातकणंगले, कोल्हापूर) आणि चालक अनिल सुरेश नाईक (२४, रा. शिवाजीनगर, शिये, ता. करवीर, कोल्हापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून तीन ब्रास वाळूसह डंपर असा दोन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुमठे फाटा येथून डंपरमधून चोरीची वाळू घेऊन कोल्हापूरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधगाव येथे सापळा रचून डंपर ताब्यात घेतले.
डंपरमधील वाळूबाबत चौकशी केली असता, ती विनापरवाना असल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी कुमठे येथील ओढापात्रातून वाळू चोरल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्यावर महाराष्ट्र गौण खनिज कायद्यांतर्गत डंपर मालक-चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.