जुना, खराब माल विकल्यास दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:20+5:302021-06-02T04:21:20+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मंगळवारपासून शिथिलता देण्यात आली आहे. प्रशासनाने काही अटींवर वेळेत ...
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मंगळवारपासून शिथिलता देण्यात आली आहे. प्रशासनाने काही अटींवर वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अन्न व्यावसायिकांनी जुना अथवा खराब माल असल्यास तो नष्ट करावा. अशा खराब मालाची विक्री करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे.
लॉकडाऊननंतर सकाळी सात ते अकरा वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. किराणा, बेकरी, फळे यासह इतर अन्न व्यावसायिकांनी खराब माल त्वरित नष्ट करावा.
अन्न उत्पादकांनी या वर्षाचा वार्षिक, सहामाही परतावा ऑनलाइन पद्धतीने सादर करावा. वार्षिक व सहामाही परतावा ३१ मेपर्यंत सादर करणे आवश्यक असते; परंतु कोरोनामुळे त्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे सर्व व्यावसायिकांनी, उत्पादकांनी पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी केले आहे.