आष्टा येथे चार दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:18+5:302021-05-03T04:22:18+5:30
आष्टा : आष्टा येथे चार दुकाने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी पालिकेच्यावतीने त्यांच्यावर ...
आष्टा : आष्टा येथे चार दुकाने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी पालिकेच्यावतीने त्यांच्यावर कारवाई केली. या दुकानदारांकडून सुमारे ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
आष्टा शहरात पालिकेच्यावतीने कोरोना जनजागृतीबाबत अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. शहरातील भाजी मंडई, शिवाजी चौक, गांधी चौक, डांगे कॉलेज परिसर, रामनगर, नागठाणे रस्ता परिसरातील व्यापाऱ्यांवर पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली.
प्रशासकीय अधिकारी सारिका खोत, डॉ. प्रज्ञा यादव, आर. एन. कांबळे, आनंदा कांबळे, संजय पाखरे, संतोष खराडे, दिलीप ढोले, विशाल घस्ते व सहकारी यांनी कारवाई केली. शहरातील पदाधिकाऱ्यांसह व्यापार्यांनी दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याने कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील इतर व्यापारी व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.
फोटो
आष्टा येथील एका पदाधिकाऱ्याचे दुकान सील करताना मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, सारिका खोत, प्रज्ञा यादव, आर. एन. कांबळे, आनंदा कांबळे व सहकारी.