सोशल मीडियावर हे शब्द वापराल, तर गुन्हा दाखल होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:33 PM2023-03-18T18:33:21+5:302023-03-18T18:33:47+5:30
तक्रार आल्यास लगेच कारवाई
सांगली : सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकजण सतर्क झाला आहे. समाजातील प्रत्येक घडामोडीवर आपले मत व्यक्त करण्यासाठीही आता हे माध्यम प्रभावी ठरत आहे. मात्र, आपले मत आत जपून मांडण्याची गरज असून, आक्षेपार्ह अथवा समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावतील, असे शब्द वापरल्यास त्यावर कारवाई होणार आहे. सायबर पोलिसांकडून नेहमीच सोशल मीडियावरील चर्चा आणि त्यामुळे कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, यास प्राधान्य देण्यात येते. यामुळेच सोशल मीडियावर टिप्पणी करताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
हे शब्द वापरणे टाळा
सोशल मीडियावर शिवीगाळ, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणे, धमकी, लहान मुलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्यास कारवाई होत
...तर होईल गुन्हा दाखल
घटना १
गेल्या वर्षी मिरज शहरात सोशल मीडियावर बोलताना धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना २
कोरोना कालावधीत सोशल मीडियावरून अनेक अफवांचीही चर्चा होती. हे टाळण्यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेही कारवाई करण्यात आली होती.
तक्रार आल्यास लगेच कारवाई
- सोशल मीडियावर असे आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल तक्रार आल्यास त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
- जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांसह सायबर पोलिस ठाण्यातही याबाबत तक्रार करण्यात येते.