वक्क बोर्डाच्या संचालकांवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:54+5:302021-09-27T04:28:54+5:30
सांगली : जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मिळकतीवरील दुकानगाळे, जमिनी या अल्पभाडेपट्टीवर देण्यात आल्या आहेत. संचालकांनी स्वत:च्या नातलग, मित्रांना हे गाळे ...
सांगली : जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मिळकतीवरील दुकानगाळे, जमिनी या अल्पभाडेपट्टीवर देण्यात आल्या आहेत. संचालकांनी स्वत:च्या नातलग, मित्रांना हे गाळे दिले आहेत. त्यांची चौकशी करून या गैरप्रकाराला आळा घालावा, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेच्या वतीने राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांच्याकडे केली.
अनिस शेख हे सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी संघटनेचे युसुफ मेस्त्री, नगरसेवक फिरोज पठाण यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मेस्त्री म्हणाले की, वक्फच्या इदगाह, दर्गा, मदरसा, मशीद या मिळकती मुख्य बाजारपेठा, तसेच रहदारीच्या ठिकाणी आहेत. या मिळकतीत दुकानगाळे, कार्यालये मोठ्या प्रमाणात आहेत. हे दुकागाळे पूर्वीच्या संचालकांनी वक्फ बोर्डाची परवानगी न घेताच अल्प भाडेपट्टीवर दिले आहेत. तत्कालीन संचालकांनी स्वत:च्या नातलग, मित्रांच्या नावावर या मिळकती केल्या आहेत. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. सांगली जिल्ह्यातही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्वच वक्फ संस्थांची चौकशी होऊन या मिळकती बाजारभावाने भाडेतत्त्वावर देण्यात याव्यात. तसे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.