लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध, भेसळयुक्त मद्यविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:16 PM2020-04-24T18:16:21+5:302020-04-24T18:19:42+5:30

अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.

 In the action of the State Excise Department | लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध, भेसळयुक्त मद्यविक्री

लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध, भेसळयुक्त मद्यविक्री

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई --- अधीक्षक किर्ती शेडगेकर्नाळ येथे १ लाख 21 हजाराहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे संचारबंदी आदेश लागू केले आहेत. मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अन्वये मंजूर असणाऱ्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सांगली जिल्ह्यात दि. २3 एप्रिल रोजी मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे छापे टाकून एकूण 2 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच १ लाख 21 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 5030 ब.लि. रसायन नाश करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली, तसेच दु. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली, सांगली व भरारी पथक व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी वर्ग यांनी केलेली आहे. लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध तसेच भेसळयुक्त मद्यविक्री, हातभट्टी विक्री तसेच मद्याचा काळा बाजार होण्याची शक्यता आहे. अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.


 

Web Title:  In the action of the State Excise Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.