विना मास्क फिरणाऱ्यांवर ८१ जणांवर कारवाई, ४३ हजार रुपये दंड वसूल, १५२ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 06:33 PM2021-05-08T18:33:39+5:302021-05-08T18:40:12+5:30
CoronaVirus Police Sangli : सांगली जिल्ह्यामध्ये लॉकडाऊननंतर संजयनगर पोलिसांनी १५२ मोटरसायकल आणि पाच चारचाकी गाड्या आठ जप्त केल्या आहेत तर विना मास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी दिली.
संजयनगर/सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये लॉकडाऊननंतर संजयनगर पोलिसांनी १५२ मोटरसायकल आणि पाच चारचाकी गाड्या आठ जप्त केल्या आहेत तर विना मास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी दिली.
सांगली परिसरात कडक लॉकडाऊन सुरु असताना संजयनगर पोलिसांनी दोन ठिकाणी नाकेबंदी करून विना मास्क फिरणाऱ्या ८१ जणांवर कारवाई करून ४३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात विनापास प्रवेश केलेल्या एकाचा समावेश आहे. पोलिसांनी सुमारे १५२ वाहने जप्त केली असून त्यामध्ये तब्बल ८ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी दिला आहे.