बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:07 PM2019-06-24T13:07:40+5:302019-06-24T13:09:12+5:30
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
सांगली : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
संघटनेचे अध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, अरुण कुंभार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेऊन शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी अभिजित राऊत बोलत होते.
जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे जिल्हा परिषद सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्हांतर्गत बदली प्रकियामध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या समुपदेशनासाठी यादी प्रसिद्ध करावी, समुपदेशन प्रकियेबाबत मार्गदर्शक सूचना, नकार देण्याच्या संधीबाबत माहिती द्यावी, जिल्ह्यांतर्गत बदली प्रकियेत संवर्ग एक व संवर्ग दोनमधून लाभ घेतलेल्या सर्व शिक्षकांचे ते संवर्ग एक व दोनमध्ये पात्र असल्याबाबतचे सिद्ध करणाºया पुराव्यांची तपासणी करून संवर्ग एक व दोनमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. या शिक्षकांवर त्वरित कारवाई करून त्याठिकाणी विस्थापित शिक्षकांची सोय करावी, आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये काम करण्यास नकार दिलेल्या बदलीपात्र नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या प्रशासकीय बाब म्हणून होत आहेत. या शिक्षकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत सध्या शाळेत कार्यरत होते, त्या परिसरातील जवळपासच्या शाळेत अशा शिक्षकांना पदस्थापना द्यावी, काही शाळांमध्ये संच मान्यतेपेक्षा जादा शिक्षक बदलीने गेल्याचे प्रकार झाले आहेत. या शाळांमध्ये पदे मॅपिंग करताना चूक झाली असल्यास या चुकीमुळे शाळेवर आलेल्या शिक्षकांची गैरसोय होणार आहे.