अपर पोलीस अधीक्षकांकडून वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:22+5:302021-04-30T04:33:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कडक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी बुधवारी सांगली, मिरजेतील प्रमुख चौकांत उपस्थित राहत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. स्वत: अपर अधीक्षक ॲक्शनमोडवर आल्याने शहरात पोलिसांकडून कारवाईने वेग घेतला होता.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीमुळे विनाकारण बाहेर फिरून संसर्गाला निमंत्रण देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
बुधवारी अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी शहरातील विजयनगर चौकासह मिरजेतील प्रमुख चौकात स्वत: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. त्यानंतर सायंकाळी इतर भागातही पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती.