नियम मोडणाऱ्यांवर कुंडलमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:20 AM2021-07-18T04:20:02+5:302021-07-18T04:20:02+5:30
कुंडलमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. यावर उपाययोजना म्हणून गाव दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. यावेळी ...
कुंडलमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती. यावर उपाययोजना म्हणून गाव दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. यावेळी औषध, शेती औषधे दुकान व दूध डेअरी, रुग्णालये यांना काही अटीवर परवानगी देण्यात आली होती, परंतु शनिवारी अचानक प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी भेट दिली. काही औषध दुकाने, पतसंस्थांमधील कर्मचारी यांची कोरोना चाचणी न केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सर्व व्यापारी, औषध दुकानदार, दूध डेअरी चालक यांनी दर पंधरा दिवसाला कोरोना चाचण्या कराव्यात अशी सूचना देण्यात आली.
पंधरा दिवसाला कोरोना चाचणी करावी, अशी सूचना प्रशासनाने यापूर्वी दिली नसल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. दंड केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मामासाहेब पवार बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, सरपंच प्रमिलाताई पुजारी, उपसरपंच माणिक पवार, सर्जेराव पवार उपस्थित होते.
170721\204-img-20210717-wa0017.jpg
कुंडल फोटो