रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी सूत्रधारांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:00+5:302021-04-28T04:29:00+5:30
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरज सिव्हिलला भेट देऊन ऑक्सिजन टंचाईबाबत आढावा बैठक घेतली. रेमडेसिविर इंजेक्शन काळा ...
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मिरज सिव्हिलला भेट देऊन ऑक्सिजन टंचाईबाबत आढावा बैठक घेतली. रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारात सिव्हिलचा एक कर्मचारी सापडला आहे. त्याबाबत सिव्हिल प्रशासनाच्या चाैकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चाैकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करणार आहे. मिरज सिव्हिलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोविड साथीच्या काळात गेले वर्षभर चांगले काम केले आहे. तुटवडा असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळा बाजारात सिव्हिलचा कर्मचाऱ्याचा सहभाग दुर्दैवी आहे. त्यामुळे याची सखोल चाैकशी होणार असल्याचेही मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. मिरज कोविड हॉस्पिटलला गरजेइतका ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने, ऑक्सिजन कंपन्यांशी संपर्क साधून येथे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा केल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.सुधीर नणंदकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.