मणेराजुरीतील सेविका-मदतनीसांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:59+5:302021-02-26T04:39:59+5:30

या दोघींवर कडक कारवाई करावी, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्याकडे पाठविणार असल्याची माहिती बाल ...

Action will be taken against maids and helpers in Manerajuri | मणेराजुरीतील सेविका-मदतनीसांवर कारवाई करणार

मणेराजुरीतील सेविका-मदतनीसांवर कारवाई करणार

Next

या दोघींवर कडक कारवाई करावी, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्याकडे पाठविणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी उल्का यशवंत चव्हाण यांनी दिली आहे.

चव्हाण म्हणाल्या, सेविका जमदाडे आणि मदतनीस कुंभार या दोघींमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारची वादावादी झाली होती. दोघींना नोटीस बजावून समज देण्यात आली होती. तरीही त्या दोघींमध्ये पुन्हा एकदा वादावादी होऊन त्याचे पर्यावसान मारामारीत झाले आहे. एकवेळा समज देऊनही दोघींच्या वर्तनात फरक पडलेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. वरिष्ठ पातळीवर घटनेची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविणार आहे. यानंतरच वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Web Title: Action will be taken against maids and helpers in Manerajuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.