‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा तासगावात काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:46+5:302021-04-14T04:24:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : देशात भाजपला गाडायचे असेल तर काँग्रेस शिवाय कोण दोन हात करू शकत नाही. वंचित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव :
देशात भाजपला गाडायचे असेल तर काँग्रेस शिवाय कोण दोन हात करू शकत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मतांचा फायदा भाजपला होत आहे. म्हणूनच आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष विवेक गुरव यांनी सांगितले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव पाटील, माजी नगराध्यक्ष अजय पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विवेक गुरव बोलत होते. महादेव पाटील म्हणाले, राज्यासह तासगाव तालुक्यात काँग्रेस मरगळ झटकून कामाला लागली आहे. तरुणांना काँग्रेसमध्ये मोठा वाव आहे. यामुळेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या मंडळींची संख्या वाढत आहे. काँग्रेसमध्ये लवकरच अन्य मोठे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवेश केलेल्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शिराळा विधानसभा उमेदवार सुरेश जाधव, जिल्हा प्रवक्ते उत्तम जानकर, महिला आघाडीच्या मनीषा शिंदे, बेंद्रीचे ग्रामपंचायत सदस्य धनाजी मलमे, प्रमोद न्यायनिर्गुणे, ओंकार माळी, सलीम शेख, दिलीप माळी, शेखर रणपक्षे, वैभव गुरव यांचा समावेश आहे.