मराठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:48+5:302020-12-30T04:35:48+5:30

कामेरी : जागतिक स्तरावर मराठी भाषेविषयी आत्मियता निर्माण व्हावी व मराठीचा प्रसार व्हावा, म्हणून विश्व मराठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम ...

Activities like Marathi Sahitya Sammelan are needed | मराठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम गरजेचे

मराठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम गरजेचे

Next

कामेरी : जागतिक स्तरावर मराठी भाषेविषयी आत्मियता निर्माण व्हावी व मराठीचा प्रसार व्हावा, म्हणून विश्व मराठी साहित्य संमेलनासारखे उपक्रम गरजेचे आहेत, असे प्रतिपादन कादंबरीकार दि. बा. पाटील यांनी केले.

कामेरी (ता. वाळवा) येथील राजकुमार पाटील यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी केनिया- नैरोबी देशाच्यावतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा कामेश्वरी साहित्य मंडळातर्फे सत्कार करण्यात आला, याप्रसंगी दि. बा. पाटील बोलत होते.

राजकुमार पाटील म्हणाले, भारताच्या व महाराष्ट्राच्या बाहेर नव्वद हजारापेक्षा जास्त मराठी लोक आहेत. ते त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रीयन सण-उत्सव साजरे करतात. नैरोबी महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गेली दोन वर्षे ते सांभाळत असून मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. २८ ते ३१ जानेवारीअखेर ऑनलाईन होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांचा दि. बा. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश खंडागळे, भास्कर पाटील, शशिकांत पाटील, जयवंत पाटील, दिलीप क्षीरसागर, प्रा. आदिक जाधव, जगदीश जाधव, माणिक माने उपस्थित होते. कवी अशोक निळकंठ यांनी आभार मानले.

फोटो ओळी -२९१२२०२०-कामेरी सत्कार न्यूज

कामेरी येथे राजकुमार पाटील यांचा दि. बा. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश खंडागळे, भास्कर पाटील, शशिकांत पाटील, प्रा.आदिक जाधव, जगदीश जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Activities like Marathi Sahitya Sammelan are needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.